रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?
मी चुकतोय हे कळणे म्हणजे आपोआपच पुढची चूक टाळणे; नाही का?
मी तर म्हणेन, दाग अच्छे है, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल
उदा. आपल्याला कचर्याचा राग येतो, म्हणून तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरिबीचा तिटकारा असतो म्हणून आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणून तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो
राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातून निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलून टाकतात.
मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलून टाकली
नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणार्या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तेच केलं. त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवून शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातून मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वापरलं
ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की
फालतू गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमूल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.
जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे
१) स्विकार करा.
समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खूप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्विकार करा, आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात रममाण व्हा, त्याचा आनंद घ्या
असचं समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजूच्यांशी भांडून काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा आणि आनंद घ्या
२) स्वतःला दररोज सुधारा. सिद्ध करा.
कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात पण त्यातून कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा
३) चुप्प बसा. विसरा.
कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणून अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते
आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात, अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?म्हणून काही ठिकाणी गप्प राहणं, तिथून निघून जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं
४) आभार मानून आनंदी व्हा!
ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवून त्याचे आभार माना. राग पळून जाईल
५) हसा!
कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहून हसा, विनोद करा, खळखळून हसा, मजा घ्या, दुःखाची तिव्रता नाहिशी होईल, जर वरील गोष्टी आत्मसात नाही केलात तर हाच राग कदाचित लकवा आणू शकतो, त्याच बरोबर रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा, निद्रानाश व डिप्रेशन देखील आणू शकतो..
ठरवा रागाचा वापर कशासाठी करायचा
तुम्हाला जे रागवतात त्यांना नक्की शेअर करा
This post was last modified on %s = human-readable time difference 12:01 pm