EXCHANGE MUTILATED NOTES : अनेक वेळा एटीएमधून फाटकी नोट आपल्याकडे येते, आपल्याकडून नकळत नोट फाटली जाते, लहान मुलांकडून तर विशेष किंवा गडबडीत आपल्याला समोरचा व्यक्ती फाटकी नोट देऊन जातो. जर ही नोट कमी किमतीची असेल तर आपल्याला काही वाटत नाही. पण , हीच नोट जर जास्त किंमतीची असेल तर आपल्याला चैन पडत नाही.
पण ,हे जर तुमच्यासोबत झाले असेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही आता ही नोट सहज बदलून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मध्यवर्ती बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल.तेथे जाऊन नोटा जमा करू शकता. या फाटलेल्या नोटांचे मूल्य इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
आरबीआय काय सांगते पहा :
खराब झालेल्या, फाटलेल्या नोटा, ज्यात डाग आहे किंवा आवश्यक संख्या गहाळ आहे किंवा नोटेचे दोन तुकडे असणाऱ्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँक (PSB) शाखेत किंवा कोणत्याही आरबीआय कार्यालयात जाऊन तेथे कोणताही फॉर्म न भरता जमा करू शकता.
या स्टेप्स वापरून बदला फाटलेल्या नोटा :
•तुम्हाला फाटलेली चलनी नोट बदलून आणण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी, मध्यवर्ती बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागणार आहे.
•‘ट्रिपल लॉक रिसेप्टेकल’ (TLR) नावाच्या बॉक्समध्ये तुम्ही सर्व तपशीलांसोबत नोट जमा करू शकता .
•त्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमचा बँक खाते क्रमांक आणि जमा केलेल्या नोटांचे मूल्य यांसारखे आवश्यक तपशील द्यावे लागणार आहेत.
•वरील तपशील भरून नोटा सीलबंद लिफाफ्यात जमा करा.
•आणि तो लिफाफा ट्रिपल लॉक रिसेप्टेकल बॉक्समध्ये टाकून द्या.
•लवकरच नोटेची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
This post was last modified on %s = human-readable time difference 12:17 pm