X

गेल्या पाच वर्षांत 16 लाखांहून अधिक भारतीयांनी केला नागरिकत्वाचा त्याग केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

Central Government: सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार 2011 पासून 16 लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले आहे.

Indian Diaspora: सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार 2011 पासून 16 लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले आहे. यापैकी सर्वाधिक 2,25,620 भारतीय असे आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी भारतीय नागरिकत्व सोडले आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांच्या वर्षनिहाय संख्येचा तपशील देताना ते म्हणाले की, 2015 मध्ये 1,31,489 लोकांनी त्यांचे नागरिकत्व सोडले, तर 2016 मध्ये 1,41,603 लोकांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. तर 2017 मध्ये 1,33,049 लोकांनी नागरिकत्वाचा त्याग केला.

त्यांच्या मते, 2018 मध्ये ही संख्या 1,34,561 होती, तर 2019 मध्ये 1,44,017, 2020 मध्ये 85,256 आणि 2021 मध्ये 1,63,370 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले होते. शंकर यांच्या मतानुसार, 2022 मध्ये ही संख्या 2,25,620 होती.

जयशंकर म्हणाले की, संदर्भासाठी 2011 चा आकडा 1,22,819 होता, तर 2012 मध्ये 1,20,923, 2013 मध्ये 1,31,405 आणि 2014 मध्ये 1,29,328 होता. 2011 पासून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांची एकूण संख्या 16,63,440 आहे.

ते पुढे म्हणाले की, माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत पाच भारतीय नागरिकांनी यूएईचे नागरिकत्व प्राप्त केले आहे. जयशंकर यांनी 135 देशांची यादी देखील दिली, ज्यांचे नागरिकत्व भारतीयांनी घेतले आहे.

दुसर्‍या प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले की, अमेरिकन कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल सरकार जागरुक आहे.

ते पुढे म्हणाले की, भारत सरकारने आयटी व्यावसायिकांसह उच्च कुशल कामगारांशी संबंधित समस्या अमेरिकन सरकारकडे सातत्याने मांडल्या आहेत. “सरकार या मुद्द्यांवर उद्योग संघटना आणि ट्रेड चेंबर्ससह विविध भागधारकांसोबत काम करत आहे,” असेही मुरलीधरन म्हणाले

This post was last modified on %s = human-readable time difference 9:34 am

Davandi: