Public Provident Fund (PPF) Investment Disadvantages : तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF योजनेच्या फायद्यांबद्दल बरेच काही वाचले आणि ऐकले असेल.
इतर बचत किंवा गुंतवणूक योजनेप्रमाणेच PPF मधील गुंतवणुकीचेही काही तोटे आहेत जे तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेतले पाहिजेत. जर तुम्ही त्यात गुंतवणूक करणार असाल तर या तोट्यांबद्दल माहिती करून घ्या
PPF म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सरकारच्या अल्प बचत योजनेतील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम योजना आहे. या योजनेच्या गुंतवणुकीवर तुम्हाला बँकांच्या मुदत ठेवीच्या तुलनेत जास्त व्याज तर मिळतोच पण या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमहाला १.५ लाखांपर्यंत आयकर सूटही मिळते.
याशिवाय मॅच्युरिटीवर मिळणारे पैसेही करमुक्त असतात. PPF खात्यातील गुंतवणुकीचा कालावधी १५ वर्षाचा आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक लोकप्रिय बचत योजना आहे, जी दीर्घ कालावधीत मोठी रक्कम जमा करण्यासाठी संधी देते. बर्याच लोकांना असे वाटते की या योजनेचे फक्त फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की PPF योजनेचे काही तोटेही आहेत
. जसे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याच प्रकारे जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे या योजनेचे काही फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे जर तुम्हीपण PPF मध्ये गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला या तोट्यांबद्दलही माहिती असली पाहिजे.
PPF चे तोटे काय?
जर तुम्ही EPF मध्ये नोंदणीकृत पगारदार कर्मचारी असाल तर PPF मधील व्याजदराच्या बाबतीत तुम्हाला मोठं नुकसान होत आहे. सध्या PPF व्याज दर ७.१०% आहे. अनेक पगारदार कर्मचारी कर बचतीसाठी PPFमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. पीपीएफवरील व्याजदराबद्दल बोलायचे झाले तर, व्याजावर वेळोवेळी परिणाम होतो.
तुमचे पैसे दीर्घ मुदतीसाठी अडकतील पीपीएफमध्ये गुंतवणुकीचा एक तोटा म्हणजे ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे. यामध्ये तुम्हाला 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल, त्यानंतर तुमची रक्कम परिपक्व होईल. अशा स्थितीत तुमचा पैसा बराच काळ अडकून राहतो.
गुंतवणुकीची कमाल मर्यादा पीपीएफमध्ये वार्षिक गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. 1.5 लाख आहे. जर तुमचा पगार खूप चांगला असेल आणि तुम्हाला या योजनेत अधिक गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकत नाही.
संयुक्त खात्याचा पर्याय नाही पीपीएफमध्ये तुम्हाला संयुक्त खात्याचा पर्याय मिळत नाही. तसेच एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडू शकत नाही. पण त्यात तुम्ही निश्चितपणे एकापेक्षा जास्त नॉमिनी बनवू शकता
This post was last modified on %s = human-readable time difference 11:56 am