💁🏻♂️ खास विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहेत.‼️
📢दवंडी❗study
👍अभ्यासासाठी ‘5️⃣ R’ महत्वाचे
👌🏻परीक्षेची तयारी 5R तत्वाचा वापर करा‼️
1️⃣. Research : सर्वात प्रथमआपल्याला काय कठीण जातं❓ हे शोधून काढा. त्यावर नोट्स तयार करा.
2️⃣. Read : वाचनाची वेळ ठरवून घ्या. त्यानुसार वाचन सुरूच ठेवा.
3️⃣. Remind : आपण जे वाचले आहे. ते डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा.
4️⃣. Rewrite : मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी ते कागदावर लिहून काढा.
5️⃣. Review : आपण केलेला अभ्यास आणि त्याचे प्लॅनिंग आहे की नाही? हे एकदा तपासून पहा.
हे ही वाचा :
https://davandi.in/2023/01/13/10वी-12वीच्या-विध्यार्थ्यां/
📍 महत्वाच्या बाबी :
🔹 क्रम ठरवा : आपल्याकडे शिल्लक असणारे दिवस आणि वेळेचे चोख नियोजन करा. आपलं खाणं, जेवणं, झोपणं आणि अभ्यास करणं याच्या वेळा नक्की करून घ्या.
🔸 घोकंपट्टी नको : केवळ घोकंपट्टी केल्याने मुद्दे अथवा विषय विसरण्याची भीती असते. त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे आपल्या भाषेत लिहून काढा.
🔹 मेडिटेशन/ रिव्हिजन : दिवसभर अभ्यास केनंतर आज आपण काय केलं? याचा सविस्तर आढावा घ्या. त्यावर विचार करा.
🤓 अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे❓
🦠कोरोनाने जीवनातील सकारात्मकता नष्ट केल्याची भावना निर्माण होत आहे. शाळा-कॉलेजपासून अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. अनेक परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे. अशात अभ्यासात मन लागत नाही हि बाब साहजिक आहे. मात्र असे होऊ नये म्हणून काय करता येईल याचा, विचार करूया..
🔰 1 आपल्याला अभ्यास का करायचा आहे? याचे कारण सर्वात प्रथम शोधा. यामुळे तुमचा उत्साह वाढेल.
🔰 2. तसेच आपला अभ्यास अधिक मनोरंजक कसा बनवता येईल याचा विचार करा.
🔰 3. ज्याने आपले मन विचलित होईल अशा कामांची यादी करून ती कामे प्रथम बंद करा.
🔰 4. स्टडी मटेरियल लहान भागांमध्ये विभागा. शॉर्ट टास्कसह प्रारंभ करा. हे आपल्याला अधिक अभ्यास करण्यास प्रवृत्त करेल.
🔰 5. अभ्यासाचे शेड्यूल बनवा आणि त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. मग त्याची सवय होऊन जाईल.
🔰 6. वेळोवेळी प्रेरणा देणारे प्रेरक विचार (कोट्स) वाचा. ते आपल्यात उत्साह भरतील.
🎒 विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खरंच महत्त्वपूर्ण आहे तरी थोडा वेळ काढून तुमच्याकडील विद्यार्थ्यांसाठी नक्की शेअर करा‼️
📚 वाचण्यासारखं बरंच काही त्यासाठी आजच जॉईन करा 📢दवंडी :
📲 [ https://davandi.in ]
🙏 सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा
This post was last modified on %s = human-readable time difference 7:12 am