एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा भडकणार, 11 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन, सरकारच्या अडचणी वाढणार

नागपूर : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे ( ST employees) आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी एसटी कामगारांनी केली होती.

यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) ठाण मांडून होते. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी केलेल्या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असतांनाच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेना संपाचं हत्यार उपासण्याच्या तयारीत आहे.

हे ही वाचा : – Latest : 15 ऑगस्टपासून सर्व सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार !!

कामगारांच्या आर्थिक प्रश्नावर 11 सप्टेंबरपासून मुंबईत आणि 13 सप्टेंबरपासून जिल्हास्तरावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. नुकतीच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची कोअर कमिटीची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली.

WhatsApp Image 2023 08 05 at 3.06.00 PM

यावेळी कामगार करारातील तरतुदीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेला ४२ टक्के महागाई भत्ता तात्काळ लागू करावा, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजार रुपयांमुळं सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली विसंगती दूर करण्याची मागणी शासनाकडे केली.

हे ही वाचा : – Post office Requirement : भारतीय टपाल विभागाने १० वी पास उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती

सोबत 4,849 कोटी रुपयांमधील शिल्लक रमकेमचे वाटप त्वरीत करा, 10 वर्षांसाठी 7 वा वेतन आयोग लागू करा, अपहार प्रवण वाहकांचे बदली धोरण रद्द करा, खासगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करावा, लिपिक-टंकलेखक पदावर बढतीसाठी 240 दिवसांची अट रद्द करा, सेवानिवृत्तांना पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा, यासह इतरही मागण्या केल्या गेल्या.

या मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे तर 13 सप्टेंबरपासून राज्यभरातील विभागीय स्तरावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी सांगितले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

WhatsApp Image 2023 08 05 at 4.23.32 PM
tc
x