Airtel Free Data : एअरटेल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी ! मोफत मिळतोय 2GB डेटा, फक्त करा हे काम…
एअरटेल ग्राहकांसाठी कंपनीकडून मोफत 2GB डेटा दिला जात आहे. मात्र ग्राहकांना त्याआधी स्मार्टफोनमध्ये एक अॅप घ्यावे लागणार आहे तेव्हाच हा फायदा मिळणार आहे.
Airtel Free Data : टेलिकाम कंपनी एअरटेलने ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली आहे. कंपनीकडून ग्राहकांना 2GB डेटा मोफत दिला जात आहे. याचा फायदा एअरटेल कंपनीचे ग्राहक विनामूल्य घेऊ शकतात. त्यासाठी कंपनीकडून वेगळी योजना आखली आहे.
तुमच्या एअरटेल सिमकार्डचा रिचार्ज संपला असेल आणि तुम्ही रिचार्ज करणार असाल तर थोडं थांबा. कारण तुम्हाला फ्री 2GB डेटा हवा असेल तर Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल.
एअरटेल थँक्स अॅप वापरून तुम्ही त्यावरून रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला 2GB डेटा पूर्णपणे मोफत दिला जाईल. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.
या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 2GB डेटा
एअरटेल थँक्स अॅप वापरून तुम्ही तुमच्या एअरटेल सिमला रिचार्ज करू शकता. तुम्हाला 2GB डेटा हवा असेल तर काही रिचार्ज प्लॅन कंपनीकडून सादर करण्यात आले आहेत. टेड प्रीपेड प्लॅन्ससह 2GB डेटा मोफत उपलब्ध असलेल्या काही योजना आहेत: रु 265, रु 359, रु 549, रु 699, रु 719 आणि रु 839. या प्लान्समध्ये 2GB डेटा दिला जातो.
एअरटेल थँक्स अॅपवरून रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. तसेच 100 रुपयांचा कॅशबॅक, मोफत विंक म्युझिक आणि एअरटेल हेलोट्यून्स दर महिन्याला Fastag वर उपलब्ध आहेत.
कंपनीचे हे अॅप वापरल्यानंतर तुम्हाला 2GB डेटाहीमोफात दिला जाणार आहे. कंपनीकडून त्यांच्या अॅपचा वापर वाढावा यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
या अॅपमध्ये एअरटेल पेमेंट्स बँक, भारती एअरटेलची बँकिंग उपकंपनी, सर्व नवीन एअरटेल शॉप, डिस्कव्हर आणि मदत विभाग देखील आहेत.
या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर 100 दशलक्षाहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. या अॅपला प्ले स्टोअरवर 4.4 रेटिंग मिळाली आहे.