सर्वांना विनंती
दीप (दिवे धुण्याची)
अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून धर्म बदनाम करत आहे …
मुळात गटारी असा कोणताही सण आपल्या धर्मात नाहीये …
हे नामकरण कोणी दारुडयाने केले आहे व दारुच्या व्यापारात ज्यांचे आर्थिक हितसंबध गुंतले आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे …
👍 या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी🙏 कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण🙏…
त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुण्याची) दिप अमावस्याच म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका.
आपला धर्म कोणत्याही सणाच्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात …
या दिवशी घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे…
हे ही वाचा : दीप अमावस्या; दीप अमावास्येपासून ‘या’ चार राशी होतील करोडपती?
वेळीच सावध व्हावे, उद्या महाराष्ट्रातील नवीन पिढीला वाटेल की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो, सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावी. …
तेव्हा सर्वांनी ह्या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती. तसेच आपल्या धर्माचा अभिमान राखून दीप अमावास्येला गटारी ना म्हणता दीप अमावस्या असेच च म्हणावे
व आपल्या सणांचा व संस्कृतीचा मान राखावा..
आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते।
आपल्या कडे *आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो.
या दिवसाला गताहारी (जो आहार गेला आहे तो) अमावस्या म्हणतात. आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत। *Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे
। आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय.
आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा। आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे। आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं। आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करू या।
गटार (Gutter) नव्हे, गताहार
गत=मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते आहार= भोजन
गत+आहार=गताहार
जसे:- शाक+आहारी=शाकाहारी
तसे:- गत+आहारी=गताहारी
गत+आहारी+अमावस्या= गताहारी अमावस्या
या दिवशी दीप पुजन करतात
हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे.
पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म, आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते.