X

अल्सर असलेल्या लोकांना सूचना

अल्सर असलेल्या लोकांना सूचना

रक्ताच्या गुठळ्या बनण्याची क्रिया रोखण्यास मदत करण्यासाठी छातीत कळ आल्यानंतर लागलीच एस्पिरिनची गोळी खायला हवी असेही त्यांनी सांगितले. मात्र ज्या लोकांना एस्पिरिन गोळीची एलर्जी आहे त्यांनी सावधान रहायला हवे. आम्ही इतर नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स, तसेच सक्रिय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव, रक्तस्त्राव विकार किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अल्सर किंवा रक्तस्त्राव स्ट्रोकचा इतिहास असलेल्या लोकांना ऍस्पिरिन गोळी टाळण्याची शिफारस करतो असे श्री बालाजी एक्शन मेडीकल इन्स्टिट्यूटमधील इंटरवेंशनल कार्डिओलॉजी सल्लागार डॉ. संजय परमार यांनी सांगितले आहे.

खूप काळ एस्पिरिन खाणे धोकादायक

एस्पिरिनच्या साईड इफेक्टने रक्तस्राव होऊ शकतो. परंतू सर्वसाधारणपणे एका डोसने असे होण्याची शक्यता खूपच कमी असते असे मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे हृदय विज्ञान गटाचे अध्यक्ष डॉ.बलबीर सिंह यांनी सांगितले. पेप्टिक अल्सर असेल तर एस्पिरिन अधिक रक्तस्राव होण्यास जबाबदार ठरू शकते. अशा वेळी पेशंटला रुग्णालयात भरती केले जाणार असल्याने आपात्कालिन स्थितीत एस्पिरिन फायदेशीर होऊ शकते असे डॉ. बलबीर सिंह यांनी सांगितले.

जर रुग्णामध्ये हृदयरोगाचा किंवा पक्ष घाताचा कोणताही इतिहास नसेल तर खूप काळ एस्पिरिन खाणे धोकादायक ठरु शकते असाही सल्ला सर गंगाराम रुग्णालयाच्या कार्डिओलॉजिस्ट विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अश्विनी मेहता यांनी सांगितले. अशा रुग्णामध्येरक्तस्रावाची जोखीम हृदय विकाराचा धक्का रोखण्यापेक्षा अधिक गंभीर असू शकते असेही मेहता यांनी सांगितले.