X

Student Exam Timetable Update : इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले

Student Exam Timetable Update : इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले :

Student Exam Timetable Update: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा घेतली जाणार असून, यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

✅ परीक्षा कालावधी: ५ ते २३ एप्रिल २०२५
✅ वेळ: सकाळी ८ ते ११
✅ निकाल जाहीर: १ मे २०२५
✅ फेरपरीक्षा: जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी

❇️ परीक्षेनंतरही शाळा बंधनकारक: यापूर्वी परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळेत येत नसत. मात्र, यंदा २५ एप्रिलपर्यंत शाळेत हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.

❇️ उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालाची जबाबदारी: ५ वी ते ८ वीच्या उत्तरपत्रिका जतन कराव्या लागणार, कारण त्यांची डायट किंवा शिक्षण विभागाकडून तपासणी केली जाऊ शकते.

महाराष्ट्रशिक्षण 2025 : परीक्षा कोणत्या दिवशी, कोणता विषय

➡️ ७ एप्रिल: नववीचा इंग्रजी विषयाचा पेपर

➡️ ८ एप्रिल: पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी (पॅटर्न) परीक्षा

➡️ ९ एप्रिल: सहावीचा गणित, आठवी व नववीचा इंग्रजी (पॅटर्न) पेपर

➡️ ११ एप्रिल: सहावी व नववीचा इंग्रजी पेपर, आठवीचा गणित (पॅटर्न) पेपर

➡️ १२ एप्रिल: सर्व वर्गांसाठी इंग्रजी, हिंदी आणि गणित परीक्षा

➡️ १५ एप्रिल: सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणिताचा पेपर

➡️ १६ एप्रिल: सहावीच्या समाजशास्त्र, आठवीच्या गणित आणि नववीच्या विज्ञान भाग-१ ची परीक्षा

➡️ १७ एप्रिल: पाचवीच्या परिसर अभ्यास, सहावीच्या चित्रकला, आठवीच्या हिंदी आणि नववीच्या विज्ञान भाग-२ ची परीक्षा

➡️ १९ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या विज्ञान, नववीच्या गणित भाग-२ (पॅटर्न) परीक्षा

➡️ २१ एप्रिल: सहावीच्या गणित (पॅटर्न), आठवीच्या समाजशास्त्र, नववीच्या हिंदी विषयाची परीक्षा

➡️ २२ एप्रिल: पाचवी व सहावीच्या शालेय शिक्षण, आठवीच्या चित्रकला, नववीच्या इतिहासाची परीक्षा

➡️ २३ एप्रिल: सहावीच्या इंग्रजी (पॅटर्न), आठवीच्या शालेय शिक्षण, नववीच्या भूगोलाची परीक्षा

परीक्षेचा निकाल १ मे रोजी लावावा लागणार असल्याने शिक्षकांना त्वरित उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करावा लागेल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जूनपूर्वी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

This post was last modified on March 23, 2025 12:18 pm

Davandi: