X

Shishak Bharti : टीईटी परीक्षेबाबत आनंदाची बातमी ! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला निर्णय….. एकदा पहा

Shishak Bharti

Shishak Bharti : टीईटी परीक्षा ऑफलाइन होणार!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2024 साठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. राज्य सरकारने परीक्षा ऑफलाइन घेण्यास मान्यता दिली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

त्यामुळे टीईटी परीक्षा राज्य परीक्षा परिषदेद्वारे घेतली जाते. मराठी, इंग्रजी, उर्दू अशा विविध माध्यमांच्या परीक्षा संगणकीय पद्धतीने घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव परीक्षा परिषदेने राज्य सरकारकडे सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

त्यामुळे ऑफलाइन किंवा प्रत्यक्ष लेखी परीक्षेचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले की, ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

परीक्षेचा वेळापत्रक: येथे क्लिक करा

This post was last modified on %s = human-readable time difference 5:53 am

Davandi: