Shishak Bharti : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक; निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी; दरमहा 15000 मानधन
राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांचा पट २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड उत्तीर्ण बेरोजगार तरूण तरूणींना शिक्षक म्हणून संधी मिळणार आहे. त्यांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शासन निर्णयात काय ?
➡️ कमी पटंसख्येच्या शाळांमध्ये नेमलेल्या कंत्राटी शिक्षकास १२ रजा असतील.
➡️ याशिवाय त्यांना नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे तास घ्यावे लागतील.
➡️ त्यांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश द्यावेत.
➡️ त्या शिक्षकाच्या कामाचे एक वर्षानंतर मूल्यमापन होईल. त्यात त्याचे काम समाधानकारक नसल्यास त्या कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त केली जाणार आहे.
➡️ दरम्यान, कंत्राटी शिक्षक मिळाल्याशिवाय त्या शाळांवरील शिक्षकांची बदली केली जाणार नाही.
➡️ या कंत्राटी शिक्षकांवर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील.
शासन निर्णयातील ठळक बाबी… >>>येथे पहा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 12:06 pm