Police bharti 2025 : राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून ६ सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील. त्यानंतर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मागील भरतीवेळी पावसाळ्यात उमेदवारांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते.
त्यामुळे आता आगामी भरती पावसाळ्यानंतर गणेशोत्सव संपल्यावर होणार आहे. आगामी दहा हजार पोलिस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे १२ ते १३ लाख अर्ज अपेक्षित आहेत. सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे. सुरवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल.
Police bharti 2025 : दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या पोलिस भरतीवेळी १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाखांवर अर्ज आले होते. आताही अर्जांची संख्या त्या प्रमाणातच राहील, यादृष्टीने पोलिस भरतीचे नियोजन केले जात आहे. Police bharti 2025 पोलिस भरतीची मैदानी एकाचवेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल. मैदानीतून १:१० प्रमाणात (एका पदासाठी दहा उमेदवार) उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षांत ही दुसरी मोठी पोलिस भरती होत आहे.
एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन
Police bharti 2025 : राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलिस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल आणि तो त्याठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला, तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे.
This post was last modified on March 25, 2025 9:57 am