X

MPSC: आधिकरी व्हायचयं! ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत…

अशी राहणार परीक्षेची पद्धत…
जाहिरात१:-
६१५ पदांसाठीची ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना येथे भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीसाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सात जिल्हाकेंद्रांवर यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. पीएसआय पदासाठी विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर पीएसआयची पूर्व परीक्षा ही २ डिसेंबरला होणार आहे. अनेक वर्षांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ६१५ जागांची जाहिरात आल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे ही वाचा:- शेवटी प्राध्यापक भरतीची वेळ आली…’MPSC’ द्वारे शेकडो रिक्त पदांची भरती केली जात आहे, वाचा कोणत्या विभागात किती जागा आहेत…

या पदभरतीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पीएसआय पदासाठी अमागास उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० राहणार आहे. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणीनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. ६१५ पदांसाठीची ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना येथे भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.

हे ही वाचा:- बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल: विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी!!

जाहिरात:-२

पदवीधरांना राष्ट्रीय तपास संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी! महिना ५६ हजारांहून अधिक पगार मिळणार
NIA Bharti 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

NIA Bharti 2023: राष्ट्रीय तपास संस्थेत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हे ही वाचा:- Notice Period rule: नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडू शकता का .

राष्ट्रीय तपास संस्था भरती – २०२३

पदाचे नाव – उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी

पद संख्या- १३

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ आणि २१ ऑक्टोबर २०२३ (पदांनुसार )

अधिकृत वेबसाईटhttp://www.nia.gov.in

पदाचे नाव पद संख्या

उप विधी अधिकारी – ४ पदे
वरिष्ठ सरकारी वकील – ३ पदे
सरकारी वकील- ५ पदे
प्रधान माहिती अधिकारी – १ पद
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील – कायदा विषयातील पदवी.

प्रधान माहिती अधिकारी – बॅचलर पदवी.

पगार
उप विधी अधिकारी – ५६ हजार १०० रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये.
वरिष्ठ सरकारी वकील – ६७ हजार ७०० रुपये ते २ लाख ८ हजार ७०० रुपये.
सरकारी वकील – ७८ हजार ८०० रुपये ते २ लाख ९ हजार २०० रुपये.
प्रधान माहिती अधिकारी – १ लाख २३ हजार १०० रुपये ते २ लाख १५ हजार ९०० रुपये.

हे ही वाचा:-खास विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहेत

ही जॉब ची माहिती जास्तीत जास्त शेअर करा

This post was last modified on %s = human-readable time difference 11:56 am

Davandi: