Maharashtra ssc result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल यंदा राज्यातील 187 विद्यार्थ्यांनी जाहीर केला आहे. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
लातूर विभागातील सर्वाधिक १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली.
Maharashtra ssc result 2024 : या परीक्षेसाठी एकूण 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोकण विभागाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा सर्वाधिक 99.01 टक्के निकाल लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९४.७३ टक्के लागला आहे. निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले आणि ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे यंदा निकालात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या वर्षी राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते.
Maharashtra ssc result 2024 : यंदा ८१ हजार ९९१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 5 लाख 58 हजार 21 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. राज्य मंडळाने सांगितले की, 100% गुण मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला आहे. पुणे विभागातून 10, नागपूर विभागातून 1, छत्रपती संभाजीनगर विभागातून 32, मुंबई विभागातून 8, कोल्हापूर विभागातून 3 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर लातूरच्या 123 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत.
दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९८ टक्के निकाल वाढला
विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
>>>>येथे क्लिक करा <<<<
This post was last modified on %s = human-readable time difference 9:42 am