महाराष्ट्रतील विविध जिल्ह्याअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अंतर्गत विविध जिल्ह्यांतील अंगणवाडी मदतनीस पदांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 480 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ही भरती फक्त महिला उमेदवारांसाठी असेल. अंगणवाडी मदतनीस भरती 2023 बद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 :
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
एकूण पद संख्या – ४८०
शैक्षणिक पात्रता –१२ वी पास, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
भरतीसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
पगार –भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारा महिना ५,५०० पगार देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान १८ तर कमाल ३५ वर्षे वय असावे. (विधवा महिलांकरिता ४० वर्षे)
अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ महत्वाच्या तारखा :
{जिल्हा अधिसूचना दिनांक अर्ज सुरु होण्याची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख } :
अकोला आणि वाशीम – १५ जून २०२३, ३ जुलै २०२३ ,१४ जुलै २०२३
बुलढाणा – १६ जून २०२३ १६ जून २०२३ ३० जून २०२३
अहमदनगर – १६ जून २०२३ १९ जून २०२३ ०३ जुलै २०२३
सातारा – १६ जून २०२३ १६ जून २०२३ ३० जून २०२३
मुंबई – १९ जून २०२३ १९ जून २०२३ २८ जून २०२३
अर्ज पाठवायचा पत्ता :
अहमदनगर – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बालेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, ४१३७०२
वाशीम आणि अकोला – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय,
बुलढाणा – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, देऊळगावराजा, बुलढाणा.
सातारा – बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा पश्चिम, केदार बिल्डिंग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शोजारी, सदर बाजार, सातारा ४१४००१
मुंबई – बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम (नागरी), मुंबई यांचे कार्यालय, पहिला मजला, बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवन बाग रोड, विटटी इंटरनॅशनल स्कुल जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड ४०००६४
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना अवश्य पाहा.
तुम्ही अवश्य लाभ घ्या व 🎓 गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा
This post was last modified on %s = human-readable time difference 12:52 pm