X

Gov Job, MPSC / UPSC Update: तुम्ही Mpsc/ Upsc ची तयारी करतात. किंवा भविष्यात तुम्हाला तयारी करायची आहे. तर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला या तयारीला मिळताहेत, 50 हजारांचे आर्थिक सहाय्य! वाचा सविस्तर…

गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले अशा उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे. अर्ज केलेल्यांना हा लाभ मिळेल.

▪️अटी:- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी, तसेच अनुसूचित जातीचा व महत्वाचे म्हणजे तो मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा अशा अट आहे.

या योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त आणि फक्त तीन वेळा घेता येतो. ज्या लाभार्थ्यनी यापूर्वी योजनेचा लाभ तीन वेळा घेतला आहे. अश्याना लाभ मिळणार नाही. यासाठी बार्टी संस्थेने दिलेल्या लिंकवर जाऊन उपलब्ध अर्जाची प्रिंट काढून अर्ज करता येतो. या स्वर्ण संधीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे.

तुम्ही अवश्य लाभ घ्या व गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा.

This post was last modified on %s = human-readable time difference 9:04 am

Davandi: