X

Diwali Holiday : दिवाळी सुट्ट्या १४ दिवसांच्या! शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी एवढ्या सुट्ट्या उरल्या

Diwali Holiday

Diwali Holiday : अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा


चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सध्या सुरु असून या परीक्षा २७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. २८ ऑक्टोबरपासून ९ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागेल. पण १० नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरु होतील. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना १४ दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाप्रमाणे २७ ऑक्टोबरपूर्वी पहिल्या सत्राची परीक्षा संपविण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या तोंडी, प्रात्यक्षिक, सराव परीक्षा सुरु असून २५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शाळांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा संपतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

दहावीची २१ फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून

▪️ इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा: यंदा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडणार आहे. तत्पूर्वी, २४ जानेवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होईल.

▪️ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा: २१ फेब्रुवारीला सुरु होऊन १७ मार्च रोजी संपणार आहे. त्याअगोदर ३ ते २० फेब्रुवारीदरम्यान त्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार आहे.

यंदा १० दिवस अगोदर या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून त्यासंदर्भातील अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून काही दिवसांत जाहीर होईल.

‘या’ वर्षातील उर्वरित सुट्या

>>>> येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on October 20, 2024 10:01 am

Davandi: