X

पुणे विद्यापीठ उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्सी.डाटा सायन्स अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु.

पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्सी.डाटा सायन्स अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट ता.अहिल्यानगर येथील अहिल्यानगर उपकेंद्राच्या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये चार वर्षीय बी.एस्सी.डाटा सायन्स अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

पुणे विद्यापीठ : सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील परीक्षा गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोजगार प्राप्तिसाठी हा चांगला अभ्यासक्रम आहे.

विद्यापीठाच्या नव्याने विकसित होत असलेल्या उपकेंद्र अहिल्यानगरच्या बाबुर्डी घुमट येथील सब कॅम्पसमध्ये सुरु होणारा हा पहिलाच अभ्यासक्रम असून अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने शैक्षणिक प्रवेश शुल्क अतिशय कमी ठेवले आहे.

तरी प्रस्तुत अभ्यासक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर उपकेंद्राच्या कार्यलयात संपर्क साधावा किंवा 9763544579 या नंबर वर संपर्क करावा.

This post was last modified on June 8, 2025 9:29 am

Davandi: