X

Waqf Amendment  : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत मंजूर जाणून घ्या सविस्तर माहिती.!

Waqf Amendment

Waqf Amendment  : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत मंजूर जाणून घ्या सविस्तर माहिती.!

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक काल रात्री लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकावर लोकसभेत सुमारे 14 तास चर्चा झाली. चर्चेनंतर मध्यरात्री विधेयक मतदानासाठी ठेवण्यात आले होते. या विधेयकाच्या बाजूने 288, तर विरोधात 232 मते पडली.

विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे :

  • या विधेयकानुसार, वक्फ बोर्डावर गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश करणे आवश्यक झाले आहे.
  • या विधेयकामुळे वक्फ मालमत्तेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवणे कठीण होणार आहे.
  • या विधेयकामुळे वक्फ मालमत्तेची नोंदणी करणे सोपे होणार आहे.
  • या विधेयकामुळे वक्फ मालमत्तेचा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे.

विधेयकातील पुढील प्रक्रिया :


हे विधेयक आता राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत मंजूर झाल्या नंतर, राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयक कायद्यात रूपांतरित होईल.

This post was last modified on April 3, 2025 12:27 pm

Davandi: