Vitamin : जीवनसत्वे Vitamins आवश्य वापर करा.
◾अ(A)
प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते.पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते.
◾ब१(B1)
पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते.
◾ब२(B2)
मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते. यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध यातून मिळते.
◾ब३(B3)
कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट यातून मिळते
◾ब५(B5)
शरीरातील शक्ती वाढवते. धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
◾ब६(B6)
प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते. सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया यातून मिळते.
◾ब१२
पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग. यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ यातून मिळते.
◾फॉलिक ऍसिड
लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)
गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस यातून मिळते.
◾क(C)
प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते
लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे यातून मिळते.
◾ड(D)
कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक) सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
◾इ(E)
रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते.लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा यातून मिळते.
◾फ(F)
कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते. दाणे, काजू यातून मिळते.
◾के(K)
रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यातून मिळते.
हेही वाचा : आनंद वाढणार! राशनकार्ड धारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; या वस्तू मिळणार मोफत
हेही वाचा : महिलांना मिळणार तीन सिलिंडर मोफत; कोण ठरणार पात्र? कुठे कराल अर्ज?
हेही वाचा : लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर अर्जाची स्थिती
This post was last modified on August 2, 2024 12:00 pm