प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने तिला चांगलं म्हणणारे आणि चांगलं न म्हणणारे अशा दोन्ही वर्गांवर भाष्य करत टीका
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा बुधवारी (८ मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तिने सादर केलेल्या नृत्यावर महिलाही थिरकल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी गौतमी पाटीलने तिला चांगलं म्हणणारे आणि चांगलं न म्हणणारे अशा दोन्ही वर्गांवर भाष्य करत टीका केल्या आहेत.
या कार्यक्रमात गौतमीने ‘पाटलांचा बैलगाडा’ आणि ‘कच, कच, कापताना कांदा’ या दोन गाण्यांवर नृत्य केले.
गौतमी पाटील म्हणाली, “ज्याचे त्याचे विचार असतात दादा. आज काही लोक एक बोलत आहेत, तर काही लोक दुसरंच काही तरी बोलत आहेत. मला जे चांगलं म्हणतात त्यांना मी धन्यवाद करते आणि जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना बाय बाय.”
गौतमी पाटील म्हणाली “माझ्या प्रत्येक शोला पुरुषांची संख्या अधिक असते. आज महिलांची संख्या अधिक होती. महिलाही माझ्या नृत्याचा आनंद घेत होत्या. मी एकटीच नृत्य करत होती असं नाही. त्यामुळे मला खूप खूप छान वाटत आहे,” अशी भावना गौतमी पाटीलने व्यक्त केली.
व्हिडीओ पाहा :
This post was last modified on %s = human-readable time difference 4:41 am