Tulsi Vivah : वैदिक पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. यंदा तुळशी विवाह 13 नोव्हेंबरला, बुधवारी सुरू होणार आहे.
15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरे केले जातील. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना सुरुवात होईल. तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या विवाह मुहूर्तांबद्दलची माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.
मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त
▪️ नोव्हेंबर 2024 – 17, 22, 23, 25, 26, 27
▪️ डिसेंबर 2024 – 3,5,6,7,11,12,14,15,20,23,24,26
▪️ जानेवारी 2025 – 16,17,19,21,22,26
▪️ फेब्रुवारी 2025 – 3,4,7,13,16,17,20,21,22,23,25
▪️ मार्च 2025 – 1,2,3,6,7,12,15
विवाह मुहूर्तांचं महत्त्व
विवाह हे एक अतिशय पवित्र नातं असून, ते शुभ मुहूर्तावरच झालं पाहिजे. सर्व शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त अन् वेळ, तारीख असते. लग्नासाठीही शुभ मुहूर्त आणि तारीख असते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी शुभ वेळ आणि तारीख निश्चित करणं महत्त्वाचं आहे.
>>>> तुळशी विवाह: एक पवित्र प्रथा ,तुळशी विवाहाचे महत्त्व
>>>> आला हिवाळा…तब्येत सांभाळा‼️ थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं
This post was last modified on November 13, 2024 7:12 am