Tukaram Beej Sohala 2023 : यंदा तुकाराम बीज ९ मार्च २०२३ रोजी साजरा केला जाईल. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जुन भेट देतात.
‘आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’, असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो. यंदा तुकाराम बीज ९ मार्च २०२३ रोजी साजरा केला जाईल. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जुन भेट देतात
हे ही वाचा : – तुळशी माळ गळा..!, कशी बनवतात तुळशीची माळ? माळेचे महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर
संत तुकाराम महाराजांनी तेव्हाच्या अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आपल्या धारदार वाणीने रान उठवलं होतं. त्यावेळच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकोबारायांनी दिलं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकोबाराय यांना आदर्श मानत. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. संत तुकारामांनी १६५० साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुस-या दिवशी मध्यान्हाला आपला देह सोडला असं सांगितलं जातं.
मराठी संस्कृतीतील भक्ती पंथाचे एक महान प्रवर्तक, संत तुकाराम यांची जगभरात लाखो लोक पूजा करतात आणि लोक त्यांचे अभंग आणि शिकवणींपासून प्रेरणा घेतात.आजही थरारतं मंदिरातलं झाड
तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात.
तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातलं एक पिंपळाच झाड थरारतं असं सांगितलं जातं.
काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या
संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धांवर परखड भाष्य करतानाच विठोबाची मात्र मनोभावे पूजा केली. आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान केलं.
त्यांची अगाध भक्ती पाहून शेवटी विठ्ठलालाही तुकोबारायांना दर्शन देणं क्रमप्राप्त झालं. मात्र फक्त दर्शनाने माझी तृष्णा भागणार नाही तर तुझ्या चरणी कायम स्थान मिळो अशी विनंती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी केली होती.
त्या विनंतीला मान देऊन श्रीविष्णूंनी आपलं वाहन असणाऱ्या गरुडाला देहू इथे पाठवलं आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत कीर्तन करतानाच तुकोबाराय अमुचा रामराम घ्यावा असं म्हणत ,देह वैकुंठाला निघुन गेले.
This post was last modified on %s = human-readable time difference 9:32 am