अनुभवापेक्षा मोठा गुरू जगात कुठे शोधून सापडणार नाही…!
● 20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र.
● आज आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघणार, आजपासून देवाचे राजोपचार बंद; भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था सुरु.
▪️ येत्या 72 तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे – त्यामुळे पुढील 5 दिवसांत अनेक ठिकाणी मध्यम पावसाचा इशाराहि हवामान विभागाने दिला आहे.
▪️ देशाची गुप्तचर संस्था RAW च्या प्रमुखपदी छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे.
▪️ युरोप खंडात असलेल्या आयर्लंड देशात अनेक अशी दुर्गम सागरी बेटे आहेत जिथे लोकसंख्या खूप कमी आहे – त्यामुळे या भागांमधील लोकसंख्या वाढवण्यासाठी आयर्लंड सरकारने ‘Our Living Island Policy’ नावाचे नवे धोरण राबवण्यास सुरुवात केली असून
▪️ या अंतर्गत या बेटांवर स्थायिक होण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्याला 80,000 युरो अर्थात भारतीय चलनात जवळपास 71 लाख रुपये देण्याचा निर्णय आयर्लंड सरकारने घेतला आहे.
▪️ ‘आदिपुरुष’ चित्रपटाची प्रदर्शित झाल्यापासून 3 दिवसांत वर्ल्ड वाईड 340 कोटी रूपयांची कमाई झाली आहे – हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे
▪️ आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने जपानच्या मिसाकी इमूरा हिचा 15-10 च्या फरकाने पराभव करत आपले पदक पक्के केले आहे. या स्पर्धेत पदक पक्कं मिळवणारी भवानी देवी हि पहिली भारतीय तलवारबाज ठरणार आहे.
▪️ आदिपुरुष सिनेमाच्या संवाद लेखनावर देशभरातून टीका होत असून लेखक मनोज मुंतशीर यांनी वाढता रोष पाहता मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा अर्ज स्वीकारला असून त्यावर लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
● मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज तर विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा.
● MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू, राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह.
● सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रुपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितोळा दर जीएसटीसह 61 हजारांवर.
● ठाकरे गटाला मोठा धक्का, मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी.
● गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केलं अभिनंदन.
● देशभरात उष्णतेचा कहर! उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मागील काही दिवसांत उष्णतेचे 200हून अधिक लोकांचा मृत्यू.
● पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
● भारत पाकिस्तानमध्ये येत नसेल तर भारतात होणाऱ्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत पाक मंडळाने आपला संघ पाठवू नये; जावेद मियाँदाद
This post was last modified on %s = human-readable time difference 4:06 am