X

Today Morning Breaking news सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्युज| 18 ऑगस्ट 2023

▪️ पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार

▪️ बँकांमधल्या बेवारस रकमेची अन् खात्यांची माहिती काढता येणार; RBI ने लाँच केलं पोर्टल

▪️ IIT Delhi अन् DRDOने बनवले जगातील सर्वात कमी वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट

💁‍♂️ जुन्या खासगी 🚗वाहनांच्या नोंदणीचे नियम बदलले, तुम्हाला माहिती आहे का❓

↪️येथे पहा ⤵️
https://davandi.in/2023/08/10/rto-जुन्या-खासगी-वाहनांच्या/

▪️ कळव्यात 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; समिती हॉस्पिटलमध्ये दाखल, 25 ऑगस्टला येणार रिपोर्ट

▪️ शरद पवार एकेदिवशी मोदींचं नेतृत्व मान्य करतील; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

▪️ मराठवाड्यासह राज्यातील अनेक भगात पावसाची दडी, 35 लाख हेक्टरवरील खरीपाची पीकं धोक्यात; बळीराजा चिंतेत.

▪️ शाळेतील मध्यान्ह आहाराची जबाबदारी शिक्षकांना देता येणार नाही; केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली.

🤩 जन्मतारखेची बेरीज ‘ही’ असेल तर प्रेम आणि पैसा मिळायला हरकत नाही? पण…‼️
↪️येथे पहा ⤵️
https://davandi.in/2023/08/09/astrology-जन्मतारखेची-बेरीज-ही-अस/

▪️ आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार, शिर्डीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला.

▪️ इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोपल्शन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार.

▪️ माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं? बीडमधील सभेत शरद पवारांचा अजित पवारांना टोला.

▪️ शरद पवार आता हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार; शरद पवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर.

▪️ आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावलं.

▪️ हिमाचलमध्ये पावसाचा कहर! आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू; कोट्यवधीचं नुकसान.

▪️ कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह? आयुष्मान भारत ते द्वारका एक्सप्रेसवे 7 योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा दावा.

▪️ तब्बल 9 वर्षांनंतर ‘छोटा अमरनाथ यात्रा’ पुन्हा सुरु होणार; सुरक्षेसाठी कडक व्यवस्था तैनात.

👍🏻 हर घर दवंडी
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क – 9975167791

▪️ यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय भारतात जन्मठेपेची शिक्षा

😳 सावधान ❗ या’ चार प्रकारच्या लोकांशी मैत्री म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा, काय सांगते चाणक्य नीती, वाचा…‼️

↪️येथे पहा ⤵️
https://davandi.in/2023/08/05/चाणक्य-नीती-सावधान-या-च/

▪️ पुणे विभागात यंदा उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात तिप्पट टॅँकर

▪️ ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली, त्यांचा पूर्ण पक्षच आम्ही घेऊन आलो- देवेंद्र फडणवीस

▪️ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता महागाई भत्ता वाढवल्याचे जाहीर केले. त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

▪️ अ‍ॅपल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयफोननंतर अ‍ॅपलच्या ‘एअरपॉड्स’चं उत्पादन देखील आता भारतात होणार आहे. लवकरच फॉक्सकॉनच्या हैदराबादमधील फॅक्टरीत अ‍ॅपल एअरपॉड्सचं उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.

▪️ काउंटरपॉइंट रिसर्चने केलेल्या अहवालानुसार, भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. आतापर्यंत 200 मिलियन युनिट्सचा टप्पा पार करत भारताने ही बाजी मारली आहे.

▪️ आयफोन रात्रभर चार्जिंगला ठेवून झोपू नका कारण त्यामुळे फोन गरम होऊन पेट घेऊ शकतो, असा इशारा जगातील आघाडीची फोन उत्पादक कंपनी ‘ॲपल’ ने जारी केला आहे.

▪️ महाराष्ट्रात शाळा सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक ! स्त्री शिक्षणाचा वारसा असलेल्या महाराष्‍ट्रात पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या 1 कोटी 3 लाख 82 हजार 570 मुलींपैकी बारावीपर्यंत केवळ 20 लाख 54 हजार 252 मुलीच पोचल्या आहेत.

▪️ जीवन विमा पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी आहे – आता पॉलिसीतून मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स लागणार, दरम्यान हा टॅक्स किती लागणार हे आपण पुढे येणाऱ्या मेसेज मधे जाणून घेऊ.

This post was last modified on %s = human-readable time difference 3:00 am

Davandi: