X

पुढील 48 तास महत्त्वाचे! देशातील या 10 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

Weather Today : देशात सध्या कडाक्याची थंडी पसरली असताना पुन्हा एकदा हवामानात बदल झालेला आहे. या बदलांनंतर देशातील 10 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Weather Today : देशात पुन्हा एकदा हवामानाचे स्वरूप बदलण्याची अपेक्षा आहे. कारण हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

खरं तर, डोंगरावर बर्फवृष्टीसोबतच पाऊस सतत पडत आहे. त्यामुळे तेथील हवामान खूपच थंड आहे. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतांवर गेल्या अनेक दिवसांपासून बर्फवृष्टीसह पाऊस पडत आहे.

यासोबतच हवामान खात्याचे म्हणणे आहे की, 26 जानेवारीपर्यंत हवामानाचा पॅटर्न असाच राहणार असून हिमवृष्टीसह पाऊस सुरूच राहणार आहे. आज आणि उद्या 26 जानेवारीला पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो.

डोंगरावर बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस झाल्यानंतर थंडी पुन्हा एकदा परत येऊ शकते. डोंगराळ भागातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मैदानी भागातही तापमानाचा पारा खाली येईल, असे सांगण्यात येत आहे.

खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट हवामानानुसार, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. यासोबतच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर हरियाणा, उत्तर पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये गारपिटीची शक्यता आहे.

दुसरीकडे, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, लक्षद्वीप, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

This post was last modified on January 25, 2023 4:48 am

Davandi: