Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्वप्नील कुसळेने आपल्या अप्रतिम कामगिरीने इतिहास रचला. त्याने नेमबाजीच्या ५० मीटर रायफल प्रकारात तीन पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता.
खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा तो महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिम्पिक हिरो स्वप्नील कुसळेला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024 : याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘शाब्बास स्वप्नील, तुझ्या कांस्यपदकाने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.’ तुमच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे. तुम्ही आमचा अभिमान आहात”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसळे यांचे अभिनंदन केले. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
स्वप्नीलचे रौप्य पदक केवळ ०.१ गुणांनी हुकले. तरीही त्याच्या कांस्यपदकाने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. महाराष्ट्राला 72 वर्षांनंतर वैयक्तिक कामगिरीचे पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचा, त्याचे प्रशिक्षक आणि पालकांचाही यथोचित सन्मान केला जाईल. याशिवाय शूटिंगच्या पुढील तयारीसाठी स्वप्नीलला आवश्यक त्या सर्व सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशामागे कुसाळे यांचे कुटुंब, त्यांचे , प्रशिक्षक आदींचे परिश्रम महत्त्वाचे आहेत.”
हेही वाचा : आनंद वाढणार! राशनकार्ड धारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; या वस्तू मिळणार मोफत
हेही वाचा : महिलांना मिळणार तीन सिलिंडर मोफत; कोण ठरणार पात्र? कुठे कराल अर्ज?
हेही वाचा : लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर अर्जाची स्थिती
This post was last modified on %s = human-readable time difference 9:26 am