X

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 30/1/2023.

🔰 उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर; खासदार अनिल देसाईंची माहिती; म्हणाले, “आम्ही…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षानाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे.

🔰 महाराष्ट्राच्या चित्ररथाचा द्वितीय क्रमांक; कर्तव्यपथावर सादर केला होता ‘शक्तीपीठ आणि नारीशक्ती’चा देखावा

🔰 कॅमेऱ्याची फिकीर कुणाला? देशाभिमानच सर्वोच्च! राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीत सुरू होताच युवक…!
राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीतादरम्यान दिसलं युवकाचं राष्ट्रप्रेम!

🔰 पेशावरमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीत भीषण स्फोट, ९० जण जखमी
पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

🔰 बारामतीतील चांदगुडेवाडीत वाळू माफियांवर कारवाई, कऱ्हा नदीपात्रात वाळू उपसा
या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून वाळू, जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर ट्राॅली असा ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔰 पुणे : नाना पेठेत तरुणाचा खून करणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आतापर्यंत शहरातील आठ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

🔰 नागपूर: मेळघाटात दुर्मिळ रानपिंगळ्याचे दर्शन; आठ नवीन प्रजातीची नोंद
रानपिंगळ्याचे दर्शन तसे दुर्मिळच, मेळघाटात तो कधीतरी दिसतो. पक्षी सर्वेक्षणादरम्यान मेळघाटात तो दिसला आणि पक्षी अभ्यासक आनंदले.

🔰 निवडणूक ३३ जागांवर, मात्र सर्व ठिकाणी पक्षाने दिला एकच उमेदवार, वाचा पाकिस्तानमधील या अजब निवडणूकीबद्दल…
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेले इम्रान खान मार्च महिन्यात देशात होणाऱ्या पोटनिवडुकीत सर्व ३३ जागांवर निवडणूक लढणार आहेत.

🔰 नागपूर:आकाशात विमान असताना प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला अन…
नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न प्रवाशाकडून करण्यात आला. विमानातील कर्मयाऱ्यांच्या लक्षात येताच ते थांबवण्यात आले

🔰 शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘पठाण’ आता ओटीटीवरही होणार प्रदर्शित,

🔰 मुंबई : संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन
संगीतकार घाणेकर यांच्या पार्थिवावर बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

🔰 नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण
इंग्रजी शाळेत शिकणारा आपला मुलगा शाळेत, खासगी शिकवणीत जात नाही म्हणून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे.

🔰 नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण
इंग्रजी शाळेत शिकणारा आपला मुलगा शाळेत, खासगी शिकवणीत जात नाही म्हणून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे.

🔰 ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५ ते १६ माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

🔰 “भारत जोडो यात्रेत सारखी गुडघेदुखी होत होती, पण एक दिवशी चिमुकली भेटली अन् तिने…”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग
राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मीरमध्ये समारोप झाला.

🔰 IND vs NZ: सूर्याने सीएम योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट; मुख्यमंत्र्यांनी SKY सोबतचा फोटो शेअर करताना लिहिला खास संदेश
CM Yogi Adityanath’s Message: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांनी सूर्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि एक खास संदेश लिहिला, जो व्हायरल होत आहे

🔰 कर्करोगाने पतीला तर सर्पदंशाने मुलाला गमावले; जगाने दुर्लक्षित केलेल्या आईच्या लेकीने टीम इंडियाला बनवले वर्ल्ड चॅम्पियन

🔰 उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर; खासदार अनिल देसाईंची माहिती; म्हणाले, “आम्ही…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षानाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे.

🔰 “संजय राऊत हा असा व्यक्ती आहे, की राहुल गांधींचा आणि शरद पवारांचा फोटो शिवसेना भवनात…” संजय शिरसाटांचं टीकास्त्र!

🔰 दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण;अंतरिम अहवाल मंजुरीसाठी मुख्यालयाकडे

🔰 मुंबई: वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात शिंदे गटात
वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक ऍड. संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे.

🔰 IND vs NZ: सामन्यापेक्षा गाजली लखनऊची खेळपट्टी! हार्दिकनंतर टीम इंडियाच्या बॉलिंग प्रशिक्षकाची आगपाखड, क्युरेटर वादाच्या भोवऱ्यात
लखनऊच्या खेळपट्टीवर सातत्याने टीका होत आहे. सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या एकानाच्या खेळपट्टीवर निराश दिसला. त्यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक देखील भडकले.

This post was last modified on %s = human-readable time difference 12:28 pm

Tags: newsTop News
Davandi: