How To Change Gas Cylinder At Home: वर्षानुवर्षे किचनमध्ये काढूनही अनेकदा गॅस सिलेंडर बदलून नवा जोडणे हे काम कठीणच वाटते.
आज आपण याच्यावर सोपा उपाय बघूया.….
How To Change Gas Cylinder At Home: मुंबईसह अनेक शहरात आता गॅस पाईपलाईन सुविधा सुरु झाली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरच वापरल जातं. महिन्याभरात किती सिलेंडरचा वापर केला याची गणितं प्रत्येक गृहिणीजवळ असतात .
पण कधी कधी वेळेच्या आधीच गॅस सिलेंडर रिकामा झाला की खर्चापासून सगळे आकडे डोळ्यासमोर डोलू लागतात. या आकड्यांचा विचार करताना पुढचा विचार डोक्यात येतोच तो म्हणजे आता नवीन गॅस सिलेंडर जोडायचा कसा?
- सिलिंडरची दोरी ओढून झाकण काढा.
2) रेगुलेटर बंद करून त्याला काढून घ्या.
3) दुसऱ्या टाकीला रेग्युलेटर लावा
4) गॅस चा वास किंवा आवाज येत असेल तर रेग्युलेटर काढून पुन्हा लावा.
How To Change Gas Cylinder At Home: वर्षानुवर्षे किचनमध्ये काढूनही अनेकदा गॅस सिलेंडर बदलून नवा जोडणे हे काम कठीणच वाटते. नकळत झालेली चूकही जीवावर बेतू शकते याची कितीतरी उदाहरणे आपण पाहिली आहेत.
आज आपण याच समस्येवर सोपा उपाय बघणार आहोत.
गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट
जर तुम्ही गॅस सिलेंडरकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला A, B, C किंवा D अक्षरांपैकी एक दिसेल. गॅस कंपन्या संपूर्ण वर्ष म्हणजे १२ महिन्यांचे चार भाग (A, B, C आणि D) अशा भागांमध्ये एक-एक ग्रूप तयार करतात.
A गट – जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा प्रकारे अन्य तीन गटातही विभागणी केली जाते.
जर तुमच्या गॅस सिलेंडरवर D-२०२२ लिहिलेले असेल, तर याचा अर्थ हा सिलेंडर डिसेंबर २०२२ मध्ये संपला आहे.
दरम्यान गॅस सिलेंडर जोडण्याशिवाय वापरताना सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही गॅस सिलेंडरचा पाईपही दरवर्षी बदलायला हवा. वापर नसताना गॅस बंद ठेवा .
बाहेर जाताना, झोपण्याच्या आधी गॅस सिलेंडर तपासण्यास विसरू नका.
This post was last modified on %s = human-readable time difference 8:34 am