X

shravan Mass : संपूर्ण माहिती पहिला श्रावण सोमवार : सुख-समृद्धीसाठी करा महादेवाची पूजा

shravan Mass

shravan Mass : संपूर्ण माहिती पहिला श्रावण सोमवार : सुख-समृद्धीसाठी करा महादेवाची पूजा

श्रावण सोमवार

▪️सध्या श्रावण महिना सुरु असून आज पहिला श्रावणी सोमवार आहे.

▪️महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक आहे.

▪️विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते.

▪️देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात.

येथे जाणून घ्या, सोमवारी महादेवाची पूजा करण्याचा सामान्य विधी…

▪️असे करावे महादेवाचे पूजन
सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे.

▪️त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा.

▪️या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे. दिवस फलाहार तसेच दुध घेऊ शकता.

▪️संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचे दुध अर्पण करावे.

▪️त्यानंतर फुल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करावे.

▪️या सर्व गोष्टी अर्पण करताना शिव मंत्र – ऊँ महाशिवाय सोमाय नम: किंवा ऊँ नम: शिवाय। या मंत्राचा जप करा.

▪️जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते.

▪️या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करू शकता.

हेही वाचा : महिलांसाठी सुवर्णसंधी! अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू.
हेही वाचा : एजंटशिवाय घरबसून बनवा रेशन कार्ड
हेही वाचा : महिलांसाठीच्या 10मोठ्या योजना

This post was last modified on %s = human-readable time difference 9:08 am

Tags: shravan Mass
Davandi: