X

Satish Bhosale :  खोक्या भाईला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट, बिर्याणी अन् अनलिमिटेड टॉकटाईम;

Satish Bhosale

Satish Bhosale :  गुन्हेगारी जगतात गाजलेल्या खोक्या भाईला तुरुंगातही ऐशोआरामाची सवय सुटली नाही! जेलमध्ये त्याला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खोक्या भाईला जेलमध्ये बिर्याणी, स्पेशल जेवण, आणि अनलिमिटेड फोन कॉल्सची सुविधा दिली जात होती.

या प्रकाराचा पर्दाफाश झाल्यानंतर दोन पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. आता चौकशी सुरू असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गुन्हेगारांना असा सोयिस्कर वागणूक दिली जात असेल, तर कायद्याचा धाक उरणार कसा?

सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची शाही बडदास्त ठेवणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार असल्याचे दिसते.कारागृहाच्या आवारात सतीश भोसले जेवणावर ताव मारत असताना त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी गप्पा मारत उभा असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. व्हिडीओत खोक्या भाई बिनधास्त मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहे.

यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस देखील बजावणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसात बीडचे पोलीस दल सातत्याने वादात राहिले असून आता त्यामध्ये या नव्या वादाची भर पडली आहे.

Satish Bhosale :  तुमच्या मते, अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचे मत कळवा!

This post was last modified on March 25, 2025 12:26 pm

Davandi: