X

शेवटच्या क्षणी निर्णय नको

शेवटच्या क्षणी निर्णय नको

आजवर सीईटी नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अगदी शेवटच्या टप्प्यात बीबीए, बीसीए, बीएमएस आदी अभ्यासक्रमांचा प्रवेश निश्चित करत होते. आता मात्र सीईटी अनिवार्य असल्याने या प्रक्रियेत नसलेल्या विद्यार्थ्यांना यापैकी एकाही अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने सीईटीचा अर्ज भरून टाकावा, असे आवाहन महाविद्यालयांच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

■ सीईटी च्या नोंदणीची शेवटची तारीख – ११ एप्रिल नोंदणीसाठी संकेतस्थळ – www.mahacet.org सीईटी परीक्षेची तारीख – २७ ते २९ मे २०२४

दर्जा सुधारण्यासह आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी एआयसीटीईचे नियंत्रण दीर्घकालीन फायद्याचे ठरणार आहे. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी देणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये यासंबंधी जागरूकता वाढायला हवी. यासाठी महाविद्यालयांत असलेल्या कक्षाचा उपयोग करून घ्यायला हवा.