X

पाळणाघरासाठी काय सेवा प्रदान केली जाणार?

पाळणाघरासाठी काय सेवा प्रदान केली जाणार?

▪️पूर्वशालेय घटक संच, पोषण आहार, औषधे संच, खेळणी दिली जाणार आहेत.

▪️पाळणाघर भाड्यासाठी महानगर क्षेत्रासाठी १२ हजार रुपये, तर महानगर क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रासाठी ८ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

▪️पाळणाघर उभारणीसाठी एकवेळ ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

▪️योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे.

▪️पाळणाघर सेविका, मदतनीस यांच्या नियुक्तीबाबतच्या, योजना कार्यान्वित करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर समित्या

योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरांवर समित्यांची रचना करण्यात आली आहे.

  • महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती.
  • एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय स्तरावरील समिती.
  • जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती.
  • अंगणवाडी सेविका यांच्या अध्यक्षतेखाली पाळणाघर स्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे.