X

धूम्रपान बंद करण्यासाठी काय करू ?

क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वे

WHO संचालक डॉ. टेड्रोस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ही मार्गदर्शक तत्त्वे धुम्रपानाच्या विरोधात सुरू असलेल्या आमच्या जागतिक लढ्यात एक नवीन मैलाचा दगड ठरतील.

डब्ल्यूएचओचे आरोग्य संवर्धन संचालक डॉ. क्रेच यांनी सांगितले की, त्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे.

WHO ने सुचविलेले उपाय

WHO ने व्हॅरेनिसिलिनचे उपयुक्त असे वर्णन केले आहे, जे एक प्रकारचे औषध आहे जे घेतल्यास धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये निकोटीनची लालसा कमी होते.

निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT), ही एक प्रकारची थेरपी आहे.

ज्यामध्ये व्यसनाधीन व्यक्तीला निकोटीनची नियंत्रित मात्रा दिली जाते, ज्यामुळे त्याचे तंबाखू चघळण्याचे किंवा धुम्रपानाचे व्यसन हळूहळू कमी होते.

व्हॅरेनिसिलिन सारखे सायटीसिन हे औषध देखील काम करते.

ते तंबाखूची लालसा कमी करते. ज्यामुळे धूम्रपान आणि तंबाखूचे व्यसन कमी होते.