X

संपूर्ण प्रेमाच्या परीक्षेच वेळापत्रक

❤️ तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. 7 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू होत आहे. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो.

👩🏻‍❤️‍💋‍👨🏻 वर्षभर प्रेमी युगुल या आठवड्याची वाट बघत असतात. तुम्हीही या वर्षी व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची तयारी करत असाल तर जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकमधील खास दिवस.

🌹 पहिला दिवस – रोज डे (7 फेब्रुवारी)
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. पहिला दिवस म्हणजे रोज डे. म्हणजेच, या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांना लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

👩🏻‍❤️‍💋‍👨🏻 दुसरा दिवस – प्रपोज डे (8 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात.

🍫 तिसरा दिवस – चॉकलेट दिवस (9 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. ज्यामध्ये जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतात.

🧸 चौथा दिवस – टेडी डे (10 फेब्रुवारी)
हृदय टेडीसारखे (सॉफ्ट टॉय) नाजूक असते, त्यामुळे व्हॅलेंटाइन आठवड्यातील एक दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना टेडी बेअर भेट देतात.

🤝 पाचवा दिवस – प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी)
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता किंवा रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छित असाल तेव्हा तुम्ही एकमेकांना काहीना काही वचन देता.

👫🏻 सहावा दिवस – हग डे (12 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी ‘हग डे’ साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.

👩🏻‍❤️‍💋‍👨🏻 सातवा दिवस – किस डे (13 फेब्रुवारी)
प्रेम व्यक्त करताना आणि शब्दांनी प्रेम व्यक्त करता येत नसताना, प्रेमळ चुंबनाने प्रियकर खूप काही सांगू शकतो. म्हणूनच 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो.

💝 आठवा दिवस – व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी)
व्हॅलेंटाईन डे हा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे.

💁🏻‍♂️या आठ दिवसांच्या प्रेमपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या रसिकांसाठी 14 फेब्रुवारी हा निकालाचा दिवस आहे.

जोडीदाराला गिफ्ट देताना विचार करा. केवळ एखादी वस्तू देणे म्हणजेच प्रेम व्यक्त करणे नव्हे. त्याही पलिकडे अनेक गोष्टी असतात. ज्यामुळे तुमचा जोडीदार भलताच खूश होऊन जाईल. अर्थात तुम्हाला असे कोणीही असे म्हणत नाही की तुम्ही केवळ फ्लॉवर डिलिव्हरी शेड्यूल करू नका किंवा चॉकलेट गिफ्ट बॉक्स पाठवू नका.

पण त्याही पलीकडे जाऊन काही हटके गिफ्टबाबत विचार केला तर? लक्षात ठेवा की आम्ही इथे सूचवलेल्या वस्तू, भेट या केवळ कल्पना आहेत. तुमच्या जोडीदाराला खरे तर तुम्हीच चांगले ओळखू शकता. त्यामुळे तुमची पसंती हा पहिला प्राधान्य क्रम असायला हवा.

वर्षभराचे वेळापत्रक
जोडीदार आणि तुम्ही मिळून तुमच्या सुट्ट्यांचे नियोजन करा. वर्षभर आपल्याला काय करायचे, कुठे फिरायला जायचे. काय खायचे, खरेदीवर किती पैसे खर्च करायचे. बचत किती आणि कशी करायची? याबात एक छान कॅलेंडरच आपण बनवू शकता. यात तुम्ही तुमचे विकेंडही निवडू शकता.