X

मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन

मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन
ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक संस्था, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशनने १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे.

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा कॉल
पीडित ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या १४५६७ या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कॉल करता येईल. त्यांना तत्काळ मदत मिळेल. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशनची सेवा तत्पर आहे.

कोणत्याही मदतीसाठी करता येतो कॉल या हेल्पलाईनवर कुटुंबाकडून होत असलेला छळाची तक्रार, संपत्तीचा वाद, वृद्धाश्रम, कायदेविषयक सल्ला यांसह विविध समस्यांसाठी ज्येष्ठ नागरिक या हेल्पलाइनवर कॉल करून मदतीची अपेक्षा करू शकतात.

कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल…