Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेच्या एका बॅनरने सर्वाचेचं लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकला आहे. Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025 बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकार ठाकरेंसहीत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो या बॅनरवर आहे. मनसेच्या बॅनरवर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025 बाळासाहेब म्हणालेले, “माझा फोटो वापरायचा नाही”
शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी, “माझा फोटो वापरायचा नाही”, असे सांगितल्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
हेही वाचा : कोर्टात काय झालं हत्येची A टू Z स्टोरी
This post was last modified on March 27, 2025 11:28 am