pm internship yojna : भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. पीएम इंटर्नशिप योजना असं या योजनेचं नाव असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. तसेच 3 ऑक्टोबर पासून ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
काय आहे ही योजना?
- पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 5 वर्षांत देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत सुरुवातीला इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी 6,000 रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यानंतर एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- त्यापैकी 4500 रुपये भारत सरकार आणि 500 रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल.
- या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे.
- 27 नोव्हेंबरपर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप सुरू होईल.
12 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार
>>>> येथे क्लिक करा <<<<
This post was last modified on %s = human-readable time difference 10:50 am