Mineral oil reserves : अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे संशोधन सुरू होते.
▪️ पालघर, सिंधुदुर्गमधील खोल समुद्रात तब्बल 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे सापडलेले आहेत. यापूर्वी 1974 मध्ये मुंबईच्या समुद्रात जवळपास 75 सागरी मैल अंतरावर खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता. यानंतर 2017 मध्ये तेल साठे सापडले होते. येथे अमृत’ आणि ‘मुंगा’ या दोन तेल विहिरी खोदण्यात आल्या. अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधीनंतर नवा तेलसाठा सापडला आहे.
Mineral oil reserves : आधीच्या दोन तेल साठ्यांच्या तुलनेत सध्या सापडलेला तेल साठे मोठे आहेत. यामुळे तेल उत्पादन चार पटीने वाढणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. हे तेलसाठे डहाणूच्या समुद्रात 5338 आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात 19 हजार 131.72 चौरस किमी क्षेत्रफळावर आहेत. या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. भारताची तेल उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे.
This post was last modified on March 13, 2025 11:22 am