X

Maratha Aarakshan Andolan “तुम्ही निश्चिंत घरी झोपा, “संभ्रम निर्माण करू नका” मी बसलोय”

संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं; म्हणाले, “मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण…!”

गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली असून राज्य सरकारकडून यासंदर्भात चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापू लागला आहे. त्यावरून विरोधकांकडूनही राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच शिवप्रतिष्ठानचं संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची थेट आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच, सरकारकडून आश्वासनाची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, असंही त्यांनी जरांगे पाटलांना सांगितलं.

हे पण वाचा- Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

काय म्हणाले संभाजी भिडे?
मंत्री संदीपान भुमरे व अर्जुन खोतकर मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी पोहोचले असतानाच संभाजी भिडेही तिथे दाखल झाले. त्यांनी मनोज पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. “मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही, असा मूर्ख माणूस म्हणजे मी. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहेत. मागे वळून तुम्ही बघायचंच नाही की आपल्या पाठिशी कोण आहे”, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.

हे पण वाचा- Maratha Aarakshan Andolan मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून मनोज जरांगे पाटील आंदोलन तीव्र

“अजित पवार राष्ट्रवादीचे असले तरी…”
“मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करताय ते योग्य आहे. एक चांगली गोष्ट आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे. माझं असं मत आहे की आपण हे आंदोलन जिवाच्या आकांतानं तुम्ही चालवत आहात. तुमच्या तपश्चर्येला यश मिळणार. उगीच ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. आणि ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे लागलं”, असं आश्वासन यावेळी संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंना दिलं.

“मी जर यांचे तीन अध्यादेश परत पाठवू शकतो, तर…”, मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी ताणून धरलंय!

“ही लढाई एक घाव दोन तुकडे अशी नाही”
“ही लढाई आहे. झट की पट एक घाव दोन तुकडे अशी नाही. पण तुमच्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे. पण तुम्ही हे उपोषण थांबवावं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही आमचे प्रमुख आहात. मराठा समाज हिंदुस्थानच्या पाठिचा कणा आहे. तु्म्ही उपोषण थांबवा, लढा नाही. मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण जाऊ सांगुयात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत”, असं संभाजी भिडे मनोज जरांगेंना म्हणाले.

“संभ्रम निर्माण करू नका”
“आम्ही उपोषण मागे घेतलेलं नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आंदोलन थांबणार नाही. फक्त त्यांच्या ठरावात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही दुपारी बैठक घेत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आपलं सगळं समाजासमोर पारदर्शी आहे”, असं जरांगे पाटील म्हणाले.

“तुम्ही निश्चिंत घरी झोपा, मी बसलोय”
“मला ठराव बघायचा आहे. मला व समाजाला पटला तर आम्ही दोन वाजता बघू काय निर्णय घ्यायचा. पण निर्णय समाजाच्या हिताचा असेल, आंदोलन मागे घेणार नाही. ज्या दिवशी समाजाच्या हातात आरक्षणाचं प्रमाणपत्र पडेल, त्या दिवशी मी आंदोलन मागे घेईन. तोपर्यंत नाही. मी ताणून धरलं आहे. महाराष्ट्रानं बेफिकीर घरी झोपून राहायचं. हा रात्रीतून बंद करून जाईल वगैरे घाबरण्याचं कारण नाही. अजिबात जात नाही मी. तुमच्या हातात प्रमाणपत्र पडेपर्यंत मी हटत नाही. मग यांनी कितीही बैठका घेऊ द्या, कितीही ठराव करू द्या”, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय; तीन अधिकारीही निलंबित

📅 मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेसंबंधी माहिती दिली.

🗣️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची चिंता सरकारलाही आहे आणि सर्वपक्षीय बैठकीत इतर नेत्यांनी ती व्यक्त केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधिता राहावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

🌟 महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, ज्या-ज्या वेळी राज्यावर संकट आलं तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका यापूर्वीही झालेल्या आहेत. शेवटी संवाद आणि सुसंवादातून मार्ग निघत असतो.

This post was last modified on %s = human-readable time difference 6:59 am

Davandi: