X

Maharashtra Election 2024: शंभरी पार केलेले ४७ हजार मतदार

Maharashtra Election 2024

Maharashtra Election 2024 : राज्यात ११० मतदार १२० वर्षे वयाचे असल्याची माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी

राज्यात नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पाच कोटी २२ हजार ७३९ पुरूष मतदार, चार कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार, तर सहा हजार १०१ इतके तृतीयपंथी मतदारांची नोंद झालेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, शंभर वर्षपिक्षा अधिक वय असणारे ४७ हजार ३९२ मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडे असून त्यापैकी ११० मतदार हे १२० वषर्षांपेक्षा जास्त वय असणारे आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वांत जास्त मतदार पुणे जिल्ह्यात, तर सर्वांत कमी मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख

Maharashtra Election 2024 : ६९ हजार महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ आहेत.

नाबाद : – १००

राज्यातील मतदार एकूण : – ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९

>>>> जनहितार्थ जारी माझं मत – माझा अधिकार

दिव्यांग : – ६ लाख ४१ हजार ४२५

वयोगटमतदार संख्या
वयोगटमतदार संख्या
१८ ते १९ वर्षे२२ लाख २२ हजार ७०४
२० ते २९ वर्षे१ कोटी ८८ लाख ४५ हजार ००५
३० ते ३९ वर्षे२ कोटी १८ लाख १५ हजार २७८
४० ते ४९ वर्षे२ कोटी ७ लाख ३० हजार ५९८
५० ते ५९ वर्षे१ कोटी ५६ लाख १० हजार ७९४
६० ते ६९ वर्षे-९ लाख १८ हजार ५२०
७० ते ७८ वर्षे५३ लाख ५२ हजार ८३२
८० ते ८९ वर्षे२० लाख ३३ हजार ९५८
९० ते ९९ वर्षे४ लाख ४८ हजार ३८
१०० ते १०९ वर्षे४७ हजार १६९
११० ते ११९ वर्षे११३ मतदार
१२० हून अधिक वर्षे११० मतदार

>>>>> मतदान नक्की कराच. कारण येथे पहा

This post was last modified on November 18, 2024 4:22 am

Davandi: