Ladka bhau Yojna : राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार, डिप्लोमा धारकांना ८ आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.
Ladka bhau Yojna : मुख्यमंत्री म्हणाले राज्यभरातील माझ्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये दरमहा जमा होतील. काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण लाडक्या भावाचं काय?त्याचं काय तर,त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार,आता बारावी पास झालेल्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाणार आहे.
त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा >> लाडकी बहीण योजना: लाभार्थी यादी तुमचं नाव
हे ही वाचा >> आधार कार्ड वरून त्वरित ५०,००० रुपयांचे कर्ज मिळवा!
This post was last modified on %s = human-readable time difference 8:46 am