X

Lightning Bell : तुमच्या शेतात वीज पडण्याची शक्यता आहे का? भारत सरकारचा हा ॲप देणार विजेची घंटा!

Lightning Bell

Lightning Bell : राज्यात आता खरीप पेरण्या जवळ आल्या आहेत. मान्सूनला देशात सुरुवात झाली असून अनेक भागात वीज पडून शेतकऱ्यांसह अनेकांचा मृत्यू होत असल्याची वृत्त कानावर पडत आहे. भारतात दरवर्षी २ हजारांहून अधिक मृत्यू वीज पडून होतात. दरम्यान, खरीप पेरण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या ४० किमी अंतरात वीज पडू शकते का हे आता शासनाच्या ‘दामिनी’ मोबाईल ॲपमधून कळू शकणार आहे.
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था पुणे यांच्यामार्फत हा ॲप विकसित करण्यात आला आहे.

कसे कळणार आपल्या भागात वीज पडणार का?
आपल्या भागातील ४० किमी अंतरात वीज पडण्याची शक्यता कितपत आहे याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला दामिनी हा ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावा लागेल.
या ॲपला तुम्ही इथूनही डाऊनलोड करू शकता..‘Damini: Lightining Alert’ असे या ॲपचे नाव आहे.

हा ॲप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती भरावी लागेल. यात आपले नाव, मो. नं, पत्ता, पिनकोड, व्यवसाय याचा समावेश असेल.

हेही वाचा >>>
‘हे’ पुरावे जोडून जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करा आणि काही दिवसांतच मिळवा प्रमाणपत्र!

आरोग्य विमा मंजुरी आता तासभरात! कॅशलेस उपचारांसाठी लांब वाट नको!

This post was last modified on %s = human-readable time difference 12:54 pm

Davandi: