X

House construction: घर बांधकामासाठी आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रे

House construction

House construction : प्लॉट भूखंड खरेदी

आपल्याकडे अजूनही लोकांचा ओढा प्लॉट घेऊन मनपसंतीप्रमाणे घर बांधण्याकडे आहे. अजून आपल्याकडे फ्लॅट सिस्टीम पूर्णपणे रूजलेली नाही. ‘आपले घर स्वतंत्र असावे, भलेही ते छोटे का असेना’ असा विचार करणारी मंडळी आहेत. त्यासाठी प्रथम कार्य म्हणजे भूखंडाची शोधाशोध! आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून (शक्यतो सिव्हील इंजिनियर अथवा रेरा रजिस्टर्ड इस्टेट एजंट) कडून मार्गदर्शन घेतले तर ते केव्हाही फायदेशीर ठरते. कारण आपल्याला कशा प्रकारचा भूखंड हवा हे मनामध्ये ठरलेले असते.

उदा. भूखंडाचे ठिकाण (location), भूखंडाचे क्षेत्रफळ, आजूबाजूचा परिसर, रस्ते, पाणी, लाईट व इतर सोयीसुविधा ही सर्व माहिती मिळू शकते. आजच्या नियमाप्रमाणे जागा अकृषक (NA) करताना वरील सर्व गोष्टी कराव्या लागतात, त्याशिवाय अकृषक परवाना मिळत नाही व लेआऊट मंजूर होत नाही. एखादा भूखंड आवडल्यास वरील सर्व गोष्टींची खात्री स्थापत्य अभियंता करून देतो. भूखंडाला कधी अंतिम मंजूरी मिळाली आहे, समोर रोडची रुंदी किती आहे (road width), सदर भूखंडावर किती बांधकाम नियमाप्रमाणे करता येईल (Permissible FSI) व आपल्याला अपेक्षित असलेल्या गरजा पूर्ण होतील या व इतर सर्व शंकांचे निरसन करता येते.

एकदा का संपूर्ण शंकांचे निरसन झाले आणि कायदेशीर व तांत्रिक बाबी तपासल्या की भूखंड खरेदी करता येतो. संपूर्ण कागदपत्रांचा दस्त संच आपल्याकडे घ्यावा, खरेदीनंतरही नाव लावणे वगैरे बाबी कराव्या लागतात.

बांधकाम परवानगी एकदा का भूखंडाची खरेदी झाली की पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बांधकाम

परवानगी, ७/१२ उतान्यावर नोंद झाल्यानंतर महानगरपालिकेतही रितसर फी भरून भूखंडाची नोंद करणे अनिवार्य असते. त्याशिवाय बांधकाम परवानगीसाठी अर्ज करता येत नाही. खरेदी रकमेच्या १ टक्का इतकी रक्कम भरून महापालिकेमध्ये भूखंडाची नोंदणी करता येते. नंतर महापालिकेच्या परवानाधारक

आर्किटेक्ट / इंजिनियर मार्फत आपण बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. आपल्या भूखंडाच्या कागदपत्रांबरोबर इतरही काही कागदपत्रांची आवश्यकता असते. परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर स्वतःच्या मेल

आयडीवरून बांधकाम नकाशा / आराखडा व कागदपत्रे परवानगीसाठी दाखल करतो. तत्पूर्वी सदर आर्किटेक्ट / इंजिनियर परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आराखडा, अंदाजे येणारा खर्च, परवानगीसाठी लागणारा कालावधी व इतर गोष्टींचा अंदाज देऊ शकतो. आपल्या भूखंडाचा सरकारी नाव (Ready recknor rate) व आपण करत असलेले बांधकाम क्षेत्र (area in sq.m.) यावर आपल्याला रितसर विकास शुल्क व उपकर भरावा लागतो.

बांधकाम परवानगी अर्ज दाखल केल्यानंतर तत्सम अधिकारी त्याची छाननी

तसेच वीज कनेक्शन व पाणी कनेक्शन घेण्यासाठी सदर परवानगी आवश्यक असते.

बिल्डींग कंप्लीशन सर्टिफिकेट / बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (BCC)

ज्याप्रमाणे बांधकाम परवानगी घेतो त्याचप्रमाणे महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणे अनिवार्य आहे. BCC साठी काही वेगळे कागदपत्र आवश्यक असतात. आपण केलेले बांधकाम मंजूर आराखड्याप्रमाणे असेल तर इजउ मिळण्यात काही अडचण येत नाही. म्हणूनच मंजूर आराखड्याप्रमाणे बांधकाम केले तर केव्हाही योग्य ठरते.

वरील सर्व प्रक्रिया / Process अगदी प्लॉट घेण्यापासून ते बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळेपर्यंत जर मान्यताप्राप्त आर्किटेक्ट / इंजिनियरच्या सल्ल्याने केले तर आपला पैसा व वेळ वाचतो व महत्वाचे म्हणजे आपल्या मनाप्रमाणे बांधकाम होऊन संपूर्ण समाधान मिळते. आर्किटेक्ट / इंजिनियरच्या मदतीशिवाय अथवा सल्ल्याशिवाय प्रत्येक ऑफिसमध्ये जाणे, पाठपुरावा करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे वगैरे गोष्टी अतिशय कठिण होऊन जातात करतात, साईट व्हिजीट करतात, तांत्रिक बाबी तपासतात आणि मगच मंजुरी देतात. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होते. रितसर

कर भरल्यानंतर परवानगीचा नकाशा व परवानगीचे पत्र मिळते. आपण जर बँकेतून कर्ज काढून (Home loan) घर बांधत असू तर बांधकाम परवानगी गरजेची असते.

>>> मतदार ओळखपत्र नाही हे १२ पुरावेही ग्राह्य!

>>> पेट्रोल पंपावर हे पण चेक करा , फसवणूक झाली तर


>>> रागाचा झटका येतो

This post was last modified on October 27, 2024 12:14 pm

Davandi: