X

Holi Special : होळीला नेमके काय करायचे…होळीच्या राखेचे चमत्कारिक उपाय,..?

Holi Special

Holi Special : होळीला नेमके काय करायचे…..?

*घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७ बत्तासे, ५ विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ,पुरणाची पोळी,वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पुजा करावी.

*११ प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ,तूप वाहावे.,नैवद्य दाखवावा, प्रार्थना करावी.यामुळे सुख समृद्धी वाढते,कष्ट दुर होतात.

*होळीच्या दिवशी काळ्या कपडयात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्याखिशात ठेवावेत.व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो.

*७ गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रु माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये. माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित. होऊदे असे म्हणून होळीत टाकावीत.

*होळीच्या दुसरया दिवशी होळीची राख घरी आणुन त्यात थोडेसे मीठ,व राई,मिक्स करुन घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भुतप्रेत,नजरदोष,करणीदोष होत नाही.

*होळीच्या दिवसा पासून रोज ४० दिवसा पर्यत बजरंग बाणाचे रोज ३पाठ करावेत मनोकामना पुर्ण होते.

*होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला २१गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरी मध्ये उन्नती होते.

Holi Special नवग्रह दोष जाण्या साठी… होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे.व शिवलिंगास भस्म म्हणून लावावेगरीबास पुरणपोळी खावू घालावी,घरी चौमुखी दिवा लावावा. सर्वदेवाची पुजा करावी. यामुळे बाधा निवारण होते.

राहुचा दोष असेल तर…
एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरुन थोडा गुळ टाकावा.व तो नारळ अंगावरून ७ वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहुचा त्रास,दोष निघून जातो.व सर्व अडलेली कामे होऊ लागतात.

जर नेहमी धनहानी होत असेल,पैसा टिकत नसेल तर…
होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व व्दिमुखी दीवा लावा त्या दिव्यात ११ काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा ,आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका.हि क्रिया श्रध्देने करा.

Holi Special : दुर्घटना, संकटे,फार येत असतील…
तर होळीच्या दिवशी ५ लाल गुंजा ५ काळ्या गुंजा व १ नारळ घेऊन,होळीला ११प्रदक्षिणा माराव्यात व नंतर.या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरुन होळीत टाकाव्यात .

विवाह होत नाही…
लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे.या दिवशी २ विडयाची पाने,१ अख्खी सुपारी ,१ हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण. करावे,प्रार्थनाकरावी व या नंतर होळीचे दर्शन घ्यावे.
व हीच क्रिया दुसरया दिवशी धुलीवंदनाला ही करावी.
ते रोज रंगपंचमी पर्यत करावी लवकरच विवाहयोग येईल…🙏

This post was last modified on March 13, 2025 4:10 am

Davandi: