X

Happy Women’s Day : आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक ‘तिला’ आजच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

happy womens day

Happy Women’s Day : कुठे शोधायचा महिला दिन
आजीच्या खुरप्यात
आईच्या स्वयंपाक घरात
की ताईच्या कांदेपोहे कार्यक्रमात .?

कुठे शोधायचा महिलादिन
आईच्या वात्सल्यात
पत्नीच्या पाठिंब्यात
बहिणीच्या मायेत की
प्रेयसीच्या प्रेमात..?

कुठे शोधायचा महिलादिन..?
शिवबांच्या जिजाऊत
ज्योतिंबाच्या सावित्रीत
गोपाळरावांच्या आनंदीबाईत की
शंभूराजांच्या येसूत..?

कुठे शोधायचा महिला दिन
चुल आणि मुलच्या संकल्पनेत की’
अवकाशात गेलेल्या सुनिता ,कल्पनेत..?

कुठे शोधायचा महिला दिन ..?
गावात दिसणाऱ्या पती पिता पंचायतीमध्ये
की इंडिया = इंदिरा या समीकरणात..

कुठे शोधायचा महिलादिन ..?
Missing women मधे हरवलेल्या
कळ्यांमध्ये की उमलूनही असुरक्षित कळ्यांमध्ये..?

कुठे शोधायचा महिलादिन.?
आजही आर्थिक स्वातंत्र्य नसलेल्या
महिलेत की आर्थिक सुबत्ता असून glass ceiling चा बळी पडलेल्या high class women मध्ये..?

कुठे शोधायचा महिला दिन .?
कुटुंबासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी फेरणार्या कुटुंब वत्सल स्त्रीमध्ये की
घर आणि नोकरी दोन्ही बाजू
पेलणार्या रणरागिंनीमध्ये..?

कुठे शोधायचा महिलादिन ..?
गर्भाशयातून “बाईपण” घेऊन घेणाऱ्या बालिकेत की आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्यांची मन जपून संसार करुन थकलेल्या थरथरणार्या हातात…

महिलादिनाचा शोध घेतांना कधी होते घुसमट जीवाची ..
कधी वाटते भिती आजची असुरक्षितता पाहता..
कधी होते चीडचीड तिची क्षमता असुन डावललं जातं तेव्हा ..
कधी दाटतो कंठ तिची उंचच भरारी पाहून..
या सर्व कोलाहालातून
पुरुन उरतं ते
बाईचं बाईपण
कालपण ,आजपण आणि उद्यापण..✨
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✨
जगणं साजरं करणारी स्त्री समाजाचं मोठ्ठं देन आहे ,let’s be it💯
You deserve to be happy💫
महिला दिन विशेष

This post was last modified on March 8, 2025 7:25 am

Davandi: