मुंबई : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. पुण्यात या आजाराने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यानंतर आता मुंबईतही GBS आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नायर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
नायर रुग्णालयात GBS मुळे एकाचा मृत्यू
वडाळा येथील रहिवासी असलेला ५३ वर्षीय रुग्ण बीएमसीच्या बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांच्या मते, रुग्ण बऱ्याच काळापासून आजारी होता आणि अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण नायर रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता शैलेश मोहिते यांनी दिलेला महितीनुसार, या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
GBS Mumbai Death Case : नायर रुग्णालयात GBS मुळे एकाचा मृत्यू
This post was last modified on February 12, 2025 9:37 am