X

Gas kyc 2024 :अखेरची मुदत संपणार! KYC पूर्ण न केल्यास ; ३१ मे नंतर गॅस मिळणार नाही

Gas kyc 2024

Gas kyc 2024 : ग्राहकांनी ३१ मे पर्यंत केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन होणार बंद

गॅस कनेक्शनधारकांना केवायसी करण्यासाठी वितरकांकडून आवाहन केले जात आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून, केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता गॅस एजन्सी चालकांनी वर्तविली आहे. त्यामुळे लवकर गॅस सिलिंडरधारकांनी ई- केवायसी करणे आवश्यक आहे.

Gas kyc 2024 : शहर आणि परिसरातील वितरकांकडे ३१ मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे. ग्राहकांचे गॅस कनेक्शनही बंद केले जाणार आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

एजन्सीमध्ये केवायसीची सोय
>>>>येथे क्लिक करा <<<

This post was last modified on %s = human-readable time difference 12:33 pm

Tags: Gas kyc 2024
Davandi: