X

Gas Connection KYC : गॅस कनेक्शन बंद होण्याचा धोका! KYC करण्याची अंतिम मुदत

Gas Connection KYC

Gas Connection KYC : गॅस कनेक्शनधारकांनी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्याशिवाय अशा ग्राहकांना सबसिडीही मिळणार नाही.प्राप्त माहितीनुसार, केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसांपूर्वी सूचित करण्यात आले होते. नरखेड तालुक्यात वितरकांकडे ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

यापूर्वी दिलेल्या मुदतीत केवायसी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी, असे आवाहन स्थानिक गॅस एजन्सीधारकांकडून केले जात आहे.अंतिम मुदतीपर्यंत गॅसधारकांनी केवायसी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबसिडीसह इतर बाबी मिळणार नसल्याचे चित्र आहे.

ही कागदपत्रे आवश्यक >>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on June 26, 2024 5:51 am

Davandi: